Site icon साप्ताहिक एकच ध्येय

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचं काल रात्री निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचं रात्री दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात निधन झालं. तिला हृदयविकाराचा झटका आला होता.

डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, परंतु ते तिचा जीव वाचवू शकले नाहीत. पीडित महिलेला अधिक चांगल्या उपचारांसाठी हवाई मार्गानं गुरुवारी रात्री नवी दिल्लीत आणण्यात आलं होतं.

Exit mobile version