Site icon साप्ताहिक एकच ध्येय

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण समाजानं यावर आत्मचिंतन करुन जीवन मूल्यांचं अधःपतन होण्याची कारणं जाणून घेण्याची वेळ आता आली असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे. आपल्या पुरातन संस्कृतीमधे महिला, ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणारा सन्मान पुन्हा त्यांना प्राप्त व्हावा, यासाठी सामुहिक रितीनं प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

हैदराबाद इथल्या डॉ मारिचन्ना रेड्डी मनुष्यबळ विकास संस्थेच्या 94 व्या पाठ्यक्रमाच्या समापन सोहळ्यात नायडू बोलत होते. नायडू यांनी हैदराबाद, उन्नाव तसंच देशातल्या विविध ठिकाणी झालेल्या महिलांवरील अत्याचाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. निव्वळ कायदे करुन ही समस्या सुटणार नाही असंही ते म्हणाले.

पोलिसदलानं महिलांसंबधी कोणत्याही तक्रारीवर त्वरीत कारवाई करावी, असा सल्लाही त्यांनी पोलिसदलाला दिला.

Exit mobile version