नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं आत्तापर्यंत देशभरातल्या साडेपाच हजार रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे. झारखंडमधलं महुआमिलन रेल्वे स्थानक मोफत वायफाय सेवा असलेलं साडेपाच हजारावं रेल्वे स्थानक ठरलं आहे.
रेल्वेनं महाराष्ट्रातल्या मुंबई सेंट्रल स्थानकात जानेवारी २०१६ मध्ये पहिल्यांदा अशी सोय पहिल्यांदा उपलब्ध करून दिली होती. रेल्वे स्थानंकांना डिजीटल सुविधांचं केंद्र बनवता यावं या उद्देशानं ही मोहीम हाती घेतली होती.
देशभरातल्या सर्व स्थानकांवर वेगवान आणि मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रेल्वे मत्रालयाअंतर्गत असलेल्या रेलटेल या कंपनीला दिली होती.