Site icon साप्ताहिक एकच ध्येय

१३ लाख ५० हजार कोटी रुपयांचं कृषी कर्ज वितरीत करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं या वर्षासाठी, १३ लाख ५० हजार कोटी रुपयांचं कृषी कर्ज वितरीत करण्याचं उद्दिष्ट  ठेवलं आहे. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी, सेंद्रिय शेतीला उत्तेजन देण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना, २०१८-१९ या कृषी हंगामातल्या सर्व खरीप आणि रब्बी पिकांना उत्पादन खर्चाच्या १५० टक्के वाढीव हमी भाव, अशा उपक्रमांचा यासंदर्भातल्या उपाययोजनांमध्ये समावेश आहे असं त्यांनी सांगितलं.

Exit mobile version