Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी प्राप्तीकर सुधारणांसह इतर प्रयत्न सरकार करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारणी देण्याच्या दृष्टीनं कर आकारणीचं सुसूत्रीकरण करण्याबरोबरच इतर उपाय सरकार करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

नवी दिल्लीत काल त्या एका समारंभात बोलत होत्या. काही करसवलती काढून घेऊन करपद्धती अधिक सुटसुटीत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधे सरकारनं यादृष्टीनं विविध उपाययोजना केल्या असं सांगून त्या म्हणाल्या, की करवसुलीत कोणत्याही प्रकारची जोरजबरदस्ती होणार नाही.

देशभरात मालाला मागणी वाढावी, यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी गेल्या दोन महिन्यात पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज वितरित केलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कराचे दर वस्तू आणि सेवा कर परिषद ठरवेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Exit mobile version