Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशभरातल्या २४ राज्यांमधे ७९९ वन धन य़ोजना सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या  २४ राज्यांमधे ७९९ वन धन य़ोजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे १२ लाख आदिवासींना आपल्या शेतातल्या मालाला थेट बाजारपेठत नेता येईल. नुकत्याच झालेल्या आदी महोत्सवात आदिवासींच्या मालाचा  विक्रमी खप झाला होता.

५०० पेक्षा जास्त आदिवासींनी या महोत्सवात भाग घेतला होता. जवळपास २० कोटीचं उत्पन्न या महोत्सवातून मिळालं होतं, असं आदिवासी सहकारी बाजार विकास समितीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कृष्ण यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं.

समितीनं प्रसिध्द फॅशन डिजाइनर रितू बेरी यांच्याबरोबर करार केला असून, आदिवासींच्या कलाकृतींना संपूर्ण भारतात आणि परदेशात बाजारपेठा मिळवून द्यायला मदत मिळेल असं ते म्हणाले.

Exit mobile version