मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमत काल ५८० ट्रक इतक्या कांद्याची विक्रमी आवक झाली. यामुळे त्यामुळे २० हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेलेले कांद्याचे दर काल सुमारे ४ ते ५ हजार रुपयांनी गडगडले.
शुक्रवारी महापरिनिर्वाण दिनाची, आणि त्यानंतर आज रविवारची सुट्टी आल्यामुळे काल कांद्याची आवक वाढली अशी माहिती बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.