नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये परस्पर हिताच्या मुद्यांवर काम करण्यासाठी बहुउद्देशी द्विपक्षीय संबंध निर्माण व्हावेत यासाठी एकत्रितपणे काम करायला सहमती दर्शवली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रवींद जगन्नाथ यांच्यात नवी दिल्ली इथं चर्चा झाली.
सुरक्षित आणि समृद्ध मॉरिशससाठी भारत मनापासून सहकार्य करेल, याबाबत मॉरिशस सरकार आणि तिथल्या जनतेनं विश्वास बाळगावा असं मोदी यांनी या चर्चेदरम्यान सांगितलं. जुगनौथ यांनीही मॉरिशसमध्ये सुरु असलेल्या अनेक विकासकामांमध्ये भारत करत असलेल्या सहकार्याबद्दल भारताचे आभार मानले.