रायगड : महाराजांच्या सिंहासनावरील प्रतिमेला हारार्पण केले. बालेकिल्ला आणि राणीवसा या ठिकाणी सुद्धा भेट दिली. या संवर्धनाच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे जो खडक किल्ला उभारताना वापरण्यात आला, तोच खडक आताही वापरण्यात येत आहे. त्यामुळे किल्ल्याच्या मूळ स्वरूपाला तसेच राखणे सोपे जात आहे. या कामातील प्रत्येक टप्प्यासाठी जो निधी लागेल, तो दिला जाईल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.
मेणा दरवाजा येथील मार्गाने रोप-वे ने खाली परतलो. मला याचे समाधान आहे की, किल्ल्याच्या मूळ स्वरूपाला धक्का न लागता, ते तसेच कायम राखत ही संवर्धनाची कामे गतीने पूर्ण होत आहेत.
आपला इतिहास येणाऱ्या अनेक पिढ्यांना असाच पाहता यावा, त्यापासून प्रेरणा घेता यावी, हाच प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकार करते आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. लोकसहभाग सुद्धा मोलाचा आहेच!
।।छत्रपती शिवाजी महाराज की जय।।