Site icon साप्ताहिक एकच ध्येय

माथेरानमधल्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये, क्रीडासंकुलासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद

मुंबई (वृत्तसंस्था) : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधल्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये, आणि क्रीडासंकुलासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद करायला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तत्वतः मान्यता दिली आहे अशी माहिती माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी दिली आहे.

प्रेरणा सावंत यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या एका शिष्टमंडळानं नुकतीच मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन पावसामुळे माथेरानमधले रस्ते वाहून गेले असल्याचं निदर्शनाला आणून दिलं होतं.

Exit mobile version