नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातल्या उर्जेची वाढती गरज पाहाता, जीवाष्म इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीनं अधिकाधिक देशांनी आतंरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी व्हावं, असं आवाहन भारतानं केलं आहे.
माद्रिदमध्ये सुरू असलेल्या सौर आघाडीच्या मंत्री परिषदेत बोलतांना पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल हे आवाहन केलं. लहान बेटांच्या स्वरूपात असलेल्या विकसनशील देशांच्या ‘सौर उर्जा वापर’ या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा होलांड यांनी चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या सौर आघाडीनं गेल्या चार वर्षात चांगलीच प्रगती केली आहे, असंही जावडेकर यांनी यावेळी सांगितलं.