Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नेपाळमध्ये सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेचा आज समारोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरू असलेल्या १३ व्या दक्षिण आशियायी स्पर्धेत भारतानं सर्वच स्पर्धांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. भारतानं आतापर्यंत २९४ पदकांची कमाई केली. यामध्ये १५९ सुवर्ण, ९१ रौप्य आणि ४४ कास्यं पदकांचा समावेश आहे. महिला फ़ुटबाँल संघानं सलग तिसरं सुवर्ण पदक जिंकलं.

कबड्डीमध्ये पुरुष आणि महिलांच्या संघानं सुवर्ण पदक जिंकलं. भारतीय मुष्टियोद्ध्यांनी ६ सुवर्ण पदकं जिंकली. जलतरण स्पर्धेत भरतानं  २७ सुवर्ण १८ रौप्य आणि २० कांस्य पदकांसह एकूण ५० पदकं पटकावली. नेमबाजीत भारताला २० पैकी १८ सुवर्ण पदकं मिळाली. दशरथ रंगशाळा इथं या आज या स्पर्धेचा सांगता समारंभ होणार आहे.

Exit mobile version