नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी सुधारणा विधेयक पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातल्या अल्पसंख्यांकांना भारतात येण्याचे दरवाजे उघडून देईल, असं मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे. हे नागरिक तिथं धार्मिक अत्याचार सहन करत असल्याचंही ते म्हणाले.
काल रात्री केलेल्या अनेक ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हे विधेयक सत्यात उतरवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.