Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश करावा – उपराष्ट्रपती, एम व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश करावा, जेणेकरून मुलांना लहान वयातच त्याचं महत्त्व समजून ते सर्व सुजाण नागरिक बनतील, अशी प्रतिक्रिया उपराष्ट्रपती, एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली. ते काल नवी दिल्ली इथं फिक्की तर्फे आयोजित “शालेय शिक्षण” या विषयावरील परिषदेत बोलत होते.

मूल्याधारित शिक्षणावर भर देत ते म्हणाले, की शिक्षणाचा उपयोग केवळ रोजगार मिळवून देण्यासाठी न होता व्यक्तीचं सक्षमीकरण आणि ज्ञानप्राप्तीसाठी देखील त्याचा उपयोग व्हावा, असंही ते म्हणाले. शिकवणी पद्धतीमध्ये देखील आमूलाग्र बदलाची गरज असल्याचं ते म्हणाले.

रोजगारासाठी आवश्यक कौशल्य सध्या उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे व्यावसायिक शिक्षण पद्धतीमध्ये देखील बदल करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.

Exit mobile version