नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सर्वाधिक कर्जपुरवठा करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेनं निधीवर आधारित कर्जदरात म्हणजेच, एमसीएलआरमध्ये दहा बेसीस पॉईंटची कपात केली आहे.
बँकेनं काल ही घोषणा केली. हे नवे दर आजपासून लागू होणार आहेत. या आर्थिक वर्षात स्टेट बँकेनं आठव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. यामुळे हा कर्जदर आता आठ टक्क्यांऐवजी ७ पूर्णांक ९ दशांश टक्के झाला आहे.