Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देवचा-पचमी इथल्या कोळसा खाणी पुढच्या २४ तासात पुन्हा सुरु करण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देवचा-पचमी इथल्या कोळसा खाणी पुढच्या २४ तासात पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारनं केला आहे. काळ दिघा इथं सुरु असलेल्या दोन दिवसीय व्यवसाय परिषदेच्या सांगता समारंभात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं.

बिभूम जिल्ह्यातली देवचा-पचमी ही कोळसा खाण जगातली दुसरी मोठी खाण आहे. जवळपास २ पूर्णांक १ अब्ज टन इतका कोळसा साठा या खाणीत आहे. पहिल्या टप्प्यात देवानगंज इथला कोळसा काढण्याची परवानगी मिळाली असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.

जवळपास ४० लाख टन कोळसा या भागात उपलब्ध आहे. त्यामुळे ऊर्जा,  चर्म उद्योग आदी क्षेत्रात बरेच सामंजस्य करार झाल्याचं या सूत्रांनी सांगितलं. २० पेक्षा जास्त देशातले व्यावसायिक या परिषदेला उपस्थित होते.

Exit mobile version