Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एकाला अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : २००६ सालच्या मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी, महाराष्ट्रातल्या दहशतवाद विरोधी पथकानं सीमी या प्रतिबंधित संघटनेच्या आणखी एका सदस्याला दिल्लीतून अटक केली. तेरा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात मीरा रोड भागात टाकलेल्या धाडीनंतर दाखल प्रकरणी, इजाज अक्रम शेख आणि इलियास अक्रम शेख हे दोघे भाऊ, पथकाला हवे होते.  २००६ सालच्या मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी एहतेशाम सिद्दीकी, याचे ते कथितरित्या साथिदार आहेत.

इजाज याला गुरूवारी मध्यप्रदेशात बुरहानपूरमधून अटक करण्यात आलं होतं. त्याची चौकशी केल्यानंतर इलियास याला दिल्लीतून अटक करण्यात आली. या दोघांना अधिक तपासासाठी मुंबईत आणलं जात आहे. ११ जुलै २००६ रोजी मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांमध्ये १८८ जण दगावले होते. या प्रकरणातला मुख्य दोषी सिद्दीकी याला मृत्युदंड सुनावण्यात आला होता.

Exit mobile version