Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सांगली जिल्ह्यात पीएम राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बाल स्वास्थ्य उपक्रम

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या पीएम राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बाल स्वास्थ्य उपक्रम सांगली जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या कामात सांगली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

अंगणवाडीसह ३ ते १२ वयोगटातील मुलामुलींची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या शस्त्रक्रिया या योजनेतून मोफत केल्या जातात. आत्तापर्यंत ९५० मुलांवर अशा शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

या योजनेतून चालू वर्षी हृदय शस्त्रक्रियासाठी ९५  मुलांची निवड करण्यात आली. या मुलांना सांगलीतून मुंबईकडे एस आर सी सी रुग्णालयात पाठवण्यात आलं.

Exit mobile version