नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कानपूर इथं पहिल्या राष्ट्रीय गंगा परिषदेचं अध्यक्षपद भूषवत नमामि गंगा प्रकल्पाचा आढावा घेतला.
या परिषदेला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यासह केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, डॉक्टर हर्षवर्धन यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री तसंच केंद्र आणि राज्यसरकारचे अधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्र्यांनी आत्तापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेत गंगा स्वच्छतेबाबत काही उपाय सुचवले. या बैठकीआधी प्रधानमंत्र्यांनी नमामि गंगा अभियानाशी संबंधित एका प्रदर्शनाला भेट दिली.