नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेच्या निर्णयप्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत विचार करायला हवा असं सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी म्हटलं आहे, ते नागपूरात उच्च न्यायालय वकील संघटनेनं त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरानं सेंकदला १० लाख शब्द वाचले जाऊ शकल्यानं पुरावे आणि कागदपत्रांच्या वाचनाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढून न्यायप्रक्रिया सुलभ व्हायला मदत होईल असं ते म्हणाले. मात्र, मानवी बुद्धीनं दिल्या जाणा-या निर्णयप्रक्रियेला कृत्रिम बुद्धिमत्ता पर्याय ठरु शकत नाही, असा खुलासा बोबडे यांनी केला.
नागपूर उच्च न्यायालयाच्या हेरीटेज वास्तूचं उद्घाटन बोबडे यांच्या हस्ते यावेळी झालं.