Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्यापासून नागपूर इथं सुरु होणा-या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्र्यांनी आज आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अवमान केला असून या पार्श्वभूमीवर हा बहिष्कार टाकत असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी वार्ताहरांना सांगितलं. राज्यात तीन पक्षाचं सरकार सत्तेवर असून त्यांच्यामधे विसंवाद आहे, भरपूर वेळ असतानाही सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकला आहे. उद्या आधिवेशन होत आहे, पण राज्याला मंत्रीच नाहीत, त्यामुळे विषय कोणाकडे मांडायचे, असा प्रश्न विरोधकांना पडल्याचं फडनवीस म्हणाले.

त्यामुळे अशा सरकारच्या चहापानाला जाण्यात आम्हाला रस नसल्याचं ते म्हणाले. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 23 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत तातडीनं द्यावी, अशी मागणी फडनवीस यांनी यावेळी केली.

Exit mobile version