नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धाला विराम मिळाल्यानंतर चीननं अमेरिकी उत्पादनांवरचा जकातकर कमी केला आहे. अमेरिकी उत्पादनांवर चीनतर्फे लावले जाणारे प्रस्तावित १० टक्के आणि ५ टक्के जकातकर देखील कमी करण्याचं सूतोवाच चीनच्या अर्थ मंत्रालयानं केलं आहे.
अमेरिकी मोटारींवर आणि त्यांच्या सुट्या भागांवर लावला जाणारा अतिरक्त जकातकर सुद्धा रद्द करण्याचा विचार चीन करत आहे. या व्यापार करारातल्या पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून अमेरिकेनं चीनच्या उत्पादनांवरचा जकातकर रद्द केल्यामुळे चीननं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
अमेरिकेबरोबरच्या करारात जकातकर कमी करणं तसंच बौद्धिक संपदा अधिकाराचं संरक्षण करणं, याबाबत एकवाक्यता झाल्याचं चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं सांगितलं. या करारावर अद्याप स्वाक्ष-या झाल्या नाहीत.