नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात होत असलेली हिंसक निदर्शनं दुर्देवी आणि अत्यंत वेदनादायक आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
वादविवाद, चर्चा तसंच मतभेद व्यक्त करणं हे लोकशाहीचे अत्यावश्यक भाग आहेत. मात्र सार्वजनिक मालमत्तेची हानी आणि समाजजीवनात अडथळे निर्माण करणं स्वीकारार्ह नाही, असं प्रधानमंत्र्यांनी पाठवलेल्या ट्वीट संदेशामधे म्हटलं आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे सुधारणा विधेयक -2019 भरघोस पाठिंब्यानं मंजूर झालं. बर्याच राजकीय पक्षांनी तसंच खासदारांनी हे विधेयक मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.