Site icon साप्ताहिक एकच ध्येय

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी शांततेत मतदान

नक्षलप्रभावित पाच मतदारसंघांमधे 66 टक्क्यांहून अधिक मतदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान शांततेत पार पडलं. धनबाद, देवघर, गिरिदिह आणि बोकारो  या चार जिल्ह्यांत विखुरलेल्या १५ मतदारसंघांमध्ये आज मतदान झालं. कुठेही अनुचित  प्रकार घडल्याचं वृत्त नाही.

बगोदर, जमुआ, गिरिदिह, डुमरी आणि तुंडी या नक्षलग्रस्त मतदारसंघांमध्ये सुरक्षेच्या कारणासाठी मतदान दुपारी तीन वाजता संपलं. या मतदारसंघांमध्ये अंदाजे ६६ टक्के मतदान झालं. उरलेल्या दहा मतदारसंघांमध्ये, मतदान सायंकाळी पाच वाजता संपलं.

निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात २२ महिलांसह २२१ उमेदवार रिंगणात आहेत. राज पालिवर आणि  अमर बौरी या दोन मंत्र्यांचं तसंच सात माजी मंत्री आणि १४ विद्यमान आमदारांचं राजकीय भवितव्य या चौथ्या टप्प्यात मतदानयंत्रात बंद झालं.

Exit mobile version