नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि चीनमध्ये झालेल्या व्यापारी करार उल्लेखनीय असला तरीही या करारामुळे दोन्ही आर्थिक महासत्ता देशामधले सर्व पेच सुटणार नाहीत असं मत अमेरिकन व्यापारी प्रतिनिधी रॉबर्ट लाईथीजर यांनी व्यक्त केलं.
हा व्यापारी करार म्हणजे वेगवेगळी कार्यप्रणाली असलेल्या दोन देशांनी परस्पर हितासाठी उचलेलं पहिलं पाऊल आहे असंही लाईथीजर म्हणाले. या व्यापार करारा अंतर्गत शुक्रवारी चीन आणि अमेरिके दरम्यान, आर्थिक सेवा, चलन या क्षेत्रातले करार झाले आहेत.