पुणे : महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी व मायक्रोसॉफ्ट यांच्या सहकार्याने इमर्ज एक्स – महाराष्ट्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यामध्ये हायवे टू अ 100 युनिकॉर्न अंतर्गत महाराष्ट्रातील नवे व्यवसाय व तंत्रज्ञानासंदर्भात चर्चा झाली. गुजरात, राजस्थान, केरळ व महाराष्ट्र या राज्यातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मिथून जॉन, मायक्रोसॉफ्टच्या प्रमुख लतिका पाई, मायक्रोसॉफ्ट इंडियाचे कार्यकारी संचालक राजेश रेगे, मायक्रोसॉफ्टचे उदय चोप्रा, संदीप देशमुख, मायक्रोसॉफ्टचे विनायक हेगडे यांच्यासह माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग होता.