Site icon साप्ताहिक एकच ध्येय

साहित्य अकादमीकडून तेवीस भाषांमधल्या साहित्यासाठी वार्षिक पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साहित्य अकादमीने तेवीस भाषांमधल्या साहित्यासाठी  वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत.  साहित्य अकादमी पुरस्कार-2019  मराठीसाठी अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजुनही’ या काव्यसंग्रहाला यावर्षी गौरवण्यात आलं आहे.

हिंदीसाठी नंदकिशोर  आचार्य यांच्या ‘छिलते हुए अपनें को’ या काव्यसंग्रहाला  पुरस्कार मिळाला आहे, तर  इंग्रजी भाषेसाठी शशी थरुर यांच्या भारत आणि ब्रिटीश राज या विषयावरच्या ‘ऍन एरा ऑफ डार्कनेस’ या पुस्तकाला  ललितेतर विभागात पुरस्कार मिळाला आहे.

शाल, ताम्रपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. नवी दिल्लीत येत्या २५ फेब्रुवारीला समारंभपूर्वक हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, असं अकादमीनं जाहीर केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Exit mobile version