नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायदा राबवताना कोणाचंही नागरिकत्व रद्द केलं जाणार नाही, असं केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली इथं आयोजित अल्पसंख्यांक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, रद्द करण्यासाठी नाही. धार्मिक भावनांचं राजकारण करुन भीतीचं वातावरण तयार करणा-या समाज कंटकांच्या अपप्रचाराला जनतेनं बळी पडू नये, शांतता आणि सुव्यवस्था कायम राखावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी भाजप सरकारनं अनेक पावलं उचलली असून 8 लाखांहून अधिक अल्पसंख्यांकांना गेल्या पाच वर्षांत रोजगार मिळवून दिल्याचं त्यांनी सांगितलं.