नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल कायदा, इसिस, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए- मोहम्मद, हक्कानी नेटवर्क, हिजबूल मुजाहिद्दिन आणि डी कंपनी सारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करण्याचं आवाहन भारत आणि अमेरिकेनं केलं आहे. कोणत्याही देशाविरुद्ध, कोणत्याही प्रकारच्या दहशतवादासाठी आपल्या भूमीचा वापर करायला पाकिस्ताननं परवानगी देऊ नये, असं या दोन्ही देशांनी पाकिस्तानला सांगितलं आहे.
वॉशिंग्टन इथं दुसर्या दोनास दोन मंत्रीस्तरीय चर्चेनंतर जारी संयुक्त प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे. या चर्चेला भारताच्या वतीनं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तर अमेरिकेच्या वतीनं परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क टी-एस्पर उपस्थित होते. मुंबई दहशतवादी हल्ला तसंच पठाणकोट हल्ल्यातल्या दोषींना अटक करुन पाकिस्ताननं शिक्षा करावी, असंही या पत्रकात म्हटलं आहे.