Site icon साप्ताहिक एकच ध्येय

थंडीच्या तीव्र लाटेनं उत्तर भारत गारठला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थंडीच्या तीव्र लाटेनं उत्तर भारत गारठला आहे. दिल्लीत काल ५ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानही सरासरीपेक्षा ७ अंशांनी कमी होतं.

हिमाचल प्रदेशाच्या बहुतांश भागात कडाक्याची थंडी असून, केलाँगमधे सर्वात कमी, उणे १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हरयाणात नारनौल इथं साडेतीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राजस्थानातही थंडीची लाट असून, वनस्थली इथं सर्वात कमी ४ पूर्णांक ४ दशांश तापमानाची नोंद झाली. जम्मू कश्मीरमधे बनिहाल, आणि भदेरवाह इथं तापमान शून्यापेक्षा खाली होतं.

Exit mobile version