Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शासकीय; निमशासकीय स्तरावर ओबीसींच्या भरलेल्या जागांचा तपशील सादर करण्याच्या सूचना

नागपूर :  शासकीय तसेच निमशासकीय स्तरावर गेल्या दहा वर्षात ओबीसींच्या किती जागा भरल्या याची माहिती देण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सामान्य प्रशासन विभागास दिल्या.

ओबीसी विभागासमोरील प्रश्न व त्यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा विस्तृत आढावा घेण्यासाठी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही श्री. पटोले यांनी दिल्या.

ओबीसी विद्यार्थ्यांकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू करणे, ओबीसी आर्थिक विकास महामंडळास निधी वळता करणे, ओबीसी संवर्गाचा सरकारी नोकरीतील अनुशेष भरून काढणे, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ओबीसी विभागाची कार्यालये सुरु करणे,  ओबसी विद्यार्थ्यांकरिता असेलेली शिष्यवृत्ती व  उत्पन्नाची अट यामध्ये इतरांना असलेल्या सवलतीप्रमाणे समानता आणणे, महात्मा ज्योतिबा फुले यांचे समग्र वाङ्‌मय कमी किंमतीत उपलब्ध करून देणे, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थांद्वारे मराठा, कुणबी, कुणबी-मराठा यांच्यासाठी असलेल्या विविध योजना ओबीसी समाजाकरिता राबविणे, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक शहरात तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृहे, वाचनालयाची सोय उपलब्ध करून देणे. अशा विविध विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. या सर्व विषयांवर मुंबईतील बैठकीत  मुख्यमंत्री  यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली जाईल व ओबीसींचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न गांभीर्याने केला जाईल असेही अध्यक्षांनी सांगितले.  विजाभज, इमाव व विमाप्र  प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ६७१ अभ्यासक्रमांचा समावेश करून स्कॉलरशिप तथा फ्रीशीप लागू करण्याबाबत विचार करतांना यात अधिक काही अभ्यासक्रमांचा समावेश केला जावा अशा सूचनाही श्री. पटोले यांनी यावेळी दिल्या.

आज विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विविध मागण्यांच्या संदर्भात बैठक झाली.या बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीओबीसी विभागाचे प्रधान सचिव जे.पी गुप्तासामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंडराष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

Exit mobile version