Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण जिल्हास्तरिय समन्वय समितीची बैठक संपन्न

पुणे : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरिय समन्वय समितीची बैठक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए.बी. नांदापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

जिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात झालेल्या या बैठकित तंबाखू नियंत्रण कायदा व महत्वाची कलमे, तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी, जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथक कार्यवाही, जिल्ह्यात प्राप्त तक्रारीवरील कार्यवाही तसेच सर्व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त करण्यासाठी कार्यवाही आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यात येणार असल्याचे जिल्हा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए.बी. नांदापुरकर यांनी सांगितले.

यावेळी पोलीस आयुक्त कार्यालयाचे विजय टिकोळे, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्यीराज ताटे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वय अधकारी डॉ सुहासिनी घाणेकर, सल्लागार डॉ राहुल मणियार,  पुणे महानरपालिकेचे डॉ. विनोद जाधव, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दिलीप करंजखेले, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे गणेश फुंदे , परिवहन विभागाचे चंद्रकांत माने, अन्न व औषध प्रशासन विभागाचे शंतनु जगदाळे, श्रीमती ज्योती धमाळ आदी उपस्थित होते.

Exit mobile version