नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तरप्रदेशात जनतेनं शांततेचं पालन करुन कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. नविन नागरिकत्व कायद्याबाबत लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं त्यांनी सांगितलं.
दंगेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले. संवेदनशील ठिकाणी पोलीस प्रशासनाचा पहारा असून गस्तीपथकं तैनात केली आहेत. हिंसाचारात सहभागी असलेल्यांविरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे.
राज्य शासनानं शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठांना सुट्टी जाहीर केली असून उद्या होणारी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षा पुढे ढकलली आहे. परिक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होईल. लखनौसह 20 हून अधिक शहरात मोबाईल इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे.