Site icon साप्ताहिक एकच ध्येय

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लोकांची दिशाभूल करत असल्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  केला आहे.

तसंच त्रुणमूल काँग्रेस, आप आणि डावे पक्ष देखील नागरिकत्व सुधारणा कायद्याला राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याशी जोडून लोकांमध्ये भय पसरवत असल्याचं त्या म्हणाल्या. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा नागरिकांना अधिकार असल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं होतं.

Exit mobile version