Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्व.सौ.धोंडुबाई नामदेवमालक पवार सार्वजनिक मोफत वाचनालय व ज्येष्ठ नागरीक कार्यालयाचे उद्घाटन

पुणे : ‘ शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटने ‘ चे प्रदेश अध्यक्ष व उसदर नियामक मंडळाचे सदस्य विठ्ठल पवार यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त  ग्लोबल ॲग्रो फांऊडेशन, महाराष्ट्र राज्य संचलित स्व.सौ.धोंडुबाई नामदेवमालक पवार सार्वजनिक मोफत वाचनालय व ज्येष्ठ नागरीक कार्यालयाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे पुणे विभागाचे उपसंचालक मोहन राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, निवृत्त न्यायाधीश बी.आर.पाटील,  पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा चेतनाताई ढमढेरे, जिल्हाध्यक्ष हिरामण बांदल, पुणे शहराध्यक्ष दत्ता वाल्हेर, प्रदेश संघटक आ.मो. खान, ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण नाईक, सचिव प्रकाश घोरपडे, शंकरराव मोरबाळे, मानसिंग भोसले, उपाध्यक्ष वासुदेव शिंदे, युवाध्यक्ष रवी पवार, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच नागरीक   मोठया संख्येने  उपस्थित होते.
पुण्याच्या केशवनगर भागातील ससाणेकॉलनी  येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे आयोजन ग्लोबल ॲग्रो फाऊंडेशनचे सचिव रविशंकर पवार यांनी केले होते. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांकरीता मोफत वाचनालय सुरु करण्यात आले. तसेच त्यांच्याकरीता श्री.विठ्ठल पवार यांच्या मालकीची  जागा, संगणक यंत्रणा कार्यालयाकरीता उपलब्ध करुन देण्यात आली.
यावेळी बोलताना  श्री. राठोड म्हणाले की, श्री. विठ्ठल पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाकरीता दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. याचे अनुकरण सर्वांनी करावे. ज्येष्ठ नागरीकांच्या सोईकरीता केलेल्या प्रयत्नाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी  गौरवाद्गार काढले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी यांनी श्री.पवार यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक केले.
Exit mobile version