Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नव्या संसदेच्या निवडीसाठी उझबेकीस्तानात आज निवडणुका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उझबेकीस्तानमधे आज सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. देशाच्या विकासाच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. 2016 मधे राष्ट्राध्यक्ष इस्लाम करिमोफ यांच्या निधनानंतर देशात सामाजिक आणि आर्थिक बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

या निवडणुकीसाठीच्या एका नव्या नियमार्तंगत प्रत्येक पक्षाला आपल्या उमेदवारांपैकी 30 टक्के जागा महिलांना देणं बंधनकारक असणार आहे. या निवडणुकीत 5 प्रमुख पक्ष रिंगणात असून 12 भारतीय निरिक्षकांसह 500 आंतरराष्ट्रीय निरिक्षक मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

Exit mobile version