Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नवी दिल्ली इथं आंदोलकांनी केलेल्या हिंसक निदर्शनांनंतर दिल्ली पोलिसांनी केली 16 जणांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं आंदोलकांनी केलेल्या हिंसक निदर्शनांनंतर दिल्ली पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे. आंदोलकांनी दंगल घडवून पोलिसांना कर्तव्य बजावण्यात आडकाठी आणल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर लावला आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनाही अटक करण्यात आली आहे.

दंगेखोरांनी दर्यागंज इथं एका खासगी वाहन पेटवून, नंतर केलेल्या दगडफेकीत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह काही पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, दिल्ली मेट्रो मार्गावरील सर्व स्थानकांवरची सेवा सकाळीपासून सुरु झाली आहे, सर्व स्थानकांवरचे येण्या-जाण्याचे मार्ग खुल्या करण्यात आले आहेत.

नागरिकत्व विधेयकाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणामुळे काल नवी दिल्लीत 18 मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती.

Exit mobile version