Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशाअंतर्गत कारभारात अमेरिका हस्तक्षेप करत असल्याचा जर्मनीचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम युरोपला वायू पुरवठा दुपटीनं करण्यासाठीच्या प्रकल्पात रशियन कंपनीबरोबर काम करणा-या कंपनीवर, अमिरिकेनं घातलेल्या निर्बंधांवर जर्मनीनं टीकास्त्र सोडलं आहे. हा अंतर्गत कारभारात अमेरिकेचा हस्तक्षेप असल्याचा आरोप जर्मनीनं केला आहे.

पश्चिम युरोपला वायू पुरवठा करण्यासंदर्भातल्या नॉर्ड स्ट्रीम-2 मधल्या सहकंपन्यांवर अमेरिकेनं निर्बंध लादले असून, कंपन्यांची संपत्ती जप्त करायचे तसंच व्हीसा रोखायचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.

उर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी रशियावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसल्याचं मत अमेरिकेच्या खासदारांनी व्यक्त केलं आहे. सध्या, जर्मनीला पाईपलाईनद्वारे वायू पुरवठा करण्यासाठीच्या प्रकल्पात रशियासह इतर कंपन्या काम करत आहेत.

Exit mobile version