नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकी सरकारच्या एफसीसी अर्थात फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारीपदी भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरीक डॉ. मोनिषा घोष यांची नियुक्ती झाली आहे.
त्या डॉ. एरीक बर्गर यांची जागा घेतील. या पदावर नियुक्ती होणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या पहील्या अमेरिकी महिला अधिकारी ठरल्या आहेत. डॉ. मोनिषा घोष या १३ जानेवारीपासून पदभार स्विकारतील.