Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अमेरीका आणि चीन लवकरच पहिल्या टप्प्यासाठीच्या व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि चीन लवकरच पहिल्या टप्प्यासाठीच्या व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराबाबत झालेल्या चर्चेअंती अनेक मुद्द्यांवर एकमत झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये बराच काळ चाललेलं व्यापारयुध्द संपवण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांकडून प्रयत्न झाले. त्यानंतर याच महिन्यात पहील्या टप्प्यासाठीच्या व्यापार करारावर सहमती झाल्याची घोषणा करण्यात आल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे

Exit mobile version