नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून हरयाणा आणि पंजाबसह अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. काश्मीरमध्ये बऱ्याच भागात तापमानात अंशतः सुधारणा झाल्यानं कडाक्याच्या थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला.
लडाखमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती मिळाली आहे. राजस्थानमध्ये चुरू इथं चार पूर्णांक ९ दशांश सेल्सियस या किमान तापमानाची नोंद झाली. तर जयपूरमध्ये तापमान ९ अंश सेल्सियस होतं. दिल्लीमध्ये गुरुवारपर्यंत तापमान 5 अंशांनी कमी होण्याची शक्यता आहे.