नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दोहात कतार आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन चषक स्पर्धेत भारताच्या राखी हल्दर महिलेची दोन नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद

दोहा इथं सुरू असलेल्या कतार आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन चषक स्पर्धेत भारताच्या राखी हल्दर या महिला भारोत्तोलकानं 64 किलो वजनी गटात दोन नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद करत, कांस्य पदक पटकावलं. राष्ट्रकुल भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या राखीनं यावेळी स्नॅचमध्ये 95 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 123 किलो, असं एकूण 218 किलो वजन उचलत राष्ट्रीय विक्रम तर नोंदवलाच, शिवाय वैयक्तिक सर्वोच्च कामगिरीची नोंद केली.
या स्पर्धेत पहिल्याच दिवशी मीराबाई चानूनं सुवर्णपदक, तर युवा महिला भारत्तोलक जेरेमी लालरिनुन्गानं रौप्य पदक जिंकलं होतं. पुढच्या वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकसाठी या स्पर्धेतल्या पदकांमुळे मिळणारे गुण महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.