Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शहरांसाठीच्या स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत शहरी भारत हागणदारीमुक्त झाल्याचं घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शहरांसाठीच्या स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत देशभरातला शहरी परिसर हागणदारीमुक्त झाला आहे. या मोहीमे अंतर्गत देशभरातली ३५ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधली ४ हजार ३२० शहंर हागणदारीमुक्त शहरं म्हणून घोषित केली आहेत.

यांपैकी ४ हजार १६७ शहरांची बाह्ययंत्रणांच्या माध्यमातून तपासणी करून, ती शहरं हागणदारीमुक्त असल्याचं प्रमाणित केलं आहे. हागणदारीमुक्त शहरांचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सुमारे ६५ लाख ८१ हजार व्यक्तिगत, तर ५ लाख ८९ हजार सार्वजनिक शौचालयं बांधली गेली.

Exit mobile version