Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वनाथ’ मोबाईल ॲपचे लोकार्पण

????????????????????????????????????

मुंबई – अनाथांचे पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वनाथ फाउंडेशन उत्तम पद्धतीने कार्य करीत आहे. अनाथापासून स्वनाथ करण्यासाठी संवेदनशील मनाच्या लोकांना जोडणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

सीइंग आईज अँड हेल्पिंग हँड्स फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते स्वनाथ मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आले. या ॲपविषयी ड्रीम वर्थ सोल्युशनचे संचालक गगन महोत्रा यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,राज्य शासनाने अनाथांना आरक्षणाची घोषणा केल्यानंतर त्याचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. अनाथापासून स्वनाथ करण्यासाठी समाज आणि शासनाने एकत्र येऊन काम केले पाहिजे.अनाथा पासून स्वनाथ करण्यासाठी संवेदनशील मनाच्या लोकांना आपण जोडण्याचे काम करणे आवश्यक आहे.मनुष्य हा संवेदनशील असून ही संवेदना केवळ संवेदना न राहता त्या माध्यमातून एक ताकद निर्माण झाली पाहिजे. स्वनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून एक चळवळ सुरु झाली. यापुढे ही चळवळ खूप मोठी होईल. शासन यासाठी पुढाकार घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे विदेश विभाग सचिव प्रशांत हरताळकर, स्वनाथ संस्थेच्या विश्वस्त श्रेया भारतीय, कोकण प्रांताचे संघचालक सतिश मोड ,राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य डॉ. वृषाली देशपांडे उपस्थित होते. यावेळी विश्वहिंदू परिषदेचे विदेश विभाग सचिव प्रशांत हरताळकर, स्वनाथ संस्थेच्या ट्रस्टी श्रेया भारतीय, कोकण प्रांताचेसंघचालक सतिश मोड ,राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य डॉ. वृषाली देशपांडे आदी उपस्थित होते.

Exit mobile version