Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सामान्य माणसांचं आयुष्य उन्नत करण्यासाठी युवा अभियंत्यांनी तंत्रज्ञानात प्रगती आणि नव-नवे शोध लावावेत – एम. वेंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामान्य माणसांचं आयुष्य उन्नत करण्यासाठी युवा अभियंत्यांनी तंत्रज्ञानात प्रगती आणि नव-नवे शोध लावावेत असं मत उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं. ते आंध्रप्रदेशातल्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या ताडेपल्लीगुडम इथं राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या पहिल्या दिक्षांत सोहळ्यात बोलत होते.

नवे शोध हे २१ व्या शतकाचं घोषवाक्य असल्यानं आय.आय.टी आणि एन.आय.टी सारख्या संस्थांनी स्वतःला शोधाचं केंद्र बनवावं असंही नायडू म्हणाले. विद्यार्थ्यांमधलं ‘सर्वात्कृष्ठ’ शोधण्यासाठी या संस्थांनी वेळोवेळी आपल्या अभ्यासक्रमांमधे तसंच शिकवण्याच्या पद्धतींमधे सुधारणा करण्याची सूचना उपराष्ट्रपतींनी केली.

महात्मा गांधीच्या विचारांनुसार स्वयंपूर्ण खेडी तयार करण्यासाठी शाळा, रुग्णालयं, वाचनालयं, आणि कौशल्य प्रर्गात स्थापना करुन युवावर्ग आणि महिलांना सक्षम बनवण्यावरही नायडू यांनी भर दिला.

Exit mobile version