नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रातलं एनडीए सरकार वर्ष २०२४ पर्यंत डिजिटल रेडियो आणणार असल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत झालेल्या आकाशवाणी वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.
या डिजिटल रेडियोचा आवाज सुस्पष्ट असेल आणि त्याचं प्रसारण व्यापक असेल असं ते म्हणाले. संगीत, बातम्या, मनोरंजन अशा विविध माध्यमातून आकाशवाणी ही संस्था लोकांच्या आयुष्याचा घटक बनली आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
आकाशवाणीच्या बातम्यांमधे प्रचंड विश्वासार्हता असल्याचं प्रसारभारतीयचे अध्यक्ष डॉ.ए. सूर्यप्रकाश यांनी म्हटलं आहे. कानाकोप-यातनं बातम्या मिळवून त्या प्रसारित करणारी आकाशवाणी ही एक मोठी संस्था आहे, असं ते म्हणाले.सालापासून आकाशवाणी पुरस्कार द्यायला सुरुवात झाली.