Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली, प्रधानमंत्र्यांकडे मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे.

मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रधानमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तातडीनं आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत अशी विनंती ठाकरे यांनी या पत्रात केली आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र सरकारनं स्थापन केलेल्या समितीचा अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झाला आहे त्यामुळे तातडीनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यावा, अशी विनंती ठाकरे यांनी प्रधानमंत्र्यांना केली आहे.

Exit mobile version