नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी, म्हणजेच एन. पी. आर. आणि नागरिक नोंदणी पुस्तका, म्हणजेच एन. सी. आर. चा परस्पर काहीही संबंध नाही, असं गृहमंत्री अमित शाह यांनी काल एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.
एन. पी. आर. संबंधी केल्या जाणाऱ्या अफवांमुळे सामान्य आणि गरजूंना लोकोपयोगी योजनांचा लाभ घेता येणार नाही. या सर्वेक्षणामुळे गरजूंना घरगुती गॅसची सुविधा मिळू शकली. अश्या सर्वेमुळे गरजूंनाच या योजनांचा लाभ घेता आला. जनगणना दर दहा वर्षांनी केली जाते आणि एन. पी. आर.
पुरोगामी लोकशाही आघाडीच्या दरम्यान सुरु करण्यात आली, आणि ही एक चांगली प्रक्रिया असल्यानं आम्ही ते पुढे सुरु ठेवली, असंही ते म्हणाले.