मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या दुर्गम भागांमधे आदिवासी कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एक ‘वॉर रुम’ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहेत.
ते मुंबईत आदिवासी विकास खात्याच्या आढावा बैठकीत बोलत होते. या भागातल्या कुपोषणाचा प्रश्न हाताळण्यासाठी एक कृती दल स्थापन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या खात्याचा विकास योजनांसाठीच्या निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकार्यांना दिले.