Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुमुष्टियुद्ध ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत MC मेरीकोम आणि निखत झरीन दरम्यान सामना आज रंगणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी मुष्टियुद्धाचे सराव सामने दिल्ली इथं सुरु आहेत. ५१ किलो वजनी गटात मेरी कोमचा सामना निखत झरीन बरोबर होणार आहे. दोघींनी आपला पहिला सामना जिंकला आहे.

झरीनने पहिल्या सामन्यात ज्योती गुलियाला हरवलं, तर मेरी कोमनं रितू ग्रेवालला हरवलं. ५७ किलो वजनी गटात काल साक्षी चौधरीनं मनीषा मौनला नमवलं, तर ६० किलो वजनी गटात सिम्रनजीत कौरला पुढे चाल दिली आहे.

५१,५७,६०,६९आणि ७५ किलो वजनी गटातल्या एकही मुष्टियोद्ध्यानं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरी गाठली नव्हती त्यामुळे या सराव सामन्यातून सर्व मुष्टियोद्ध्यांची निवड होणार आहे.

Exit mobile version